'नमो युवा रन’ मॅरेथॉन स्पर्धेत नशा मुक्त भारताचा संकल्प

 



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर –विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त नशामुक्त भारत निर्माण करण्याच्या  संकल्पासाठी  भारतीय जनता युवा मोर्चा, अहिल्यानगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या  ‘नमो युवा रन’ या  भव्य मॅरेथॉन मध्ये डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह हजारो युवक युवतींनी सहभाग घेवूनय नशा मुक्त भारताचा संकल्प केला.

 या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या  हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.

 त्यानंतर मॅरेथॉनमध्ये डॉ विखे यांनी उत्साहाने सहभाग घेतला व विखे पाटील परिवाराच्या वतीने स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

  डॉ विखे यांनी  युवकांशी संवाद साधताना 

आजचा युवक आरोग्यदायी, शिस्तबद्ध आणि व्यसनमुक्त भारत घडविण्याच्या ध्येयाने धावत आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाचा समाजात निश्चितच नवा बदल घडविण्यात मोलाचा वाटा असेल. युवकांच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीतून समाजात सकारात्मकता व विकासाची नवी दृष्टी निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला

अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने युवक या स्पर्धेत सामील झाले. युवकांचा उत्साह, ऊर्जा आणि व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प पाहून डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, अशा स्पर्धांमुळे तरुणाईला आरोग्याचे महत्व पटते, शिस्तबद्धतेची जाणीव निर्माण होते आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. नशामुक्त भारत ही केवळ घोषणा नसून आपल्या पुढील पिढ्यांसाठी दिलेला आरोग्याचा आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे.

या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, युवा मोर्चा शहराध्यक्ष रुद्रेश अंबाडे, दक्षिण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, उत्तर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरम्यान स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उत्साह,पाहण्यास मिळाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post