माय नगर वेब टीम
Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘स्त्री 2’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. 2018 मध्ये आलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा दुसरा भाग होता. ‘स्त्री 2’ या चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रसिद्धीही वाढली असून तिला अनेक चित्रपटांसाठी ऑफरही मिळत आहे. खासकरून श्रद्धा कपूर तिच्या गोड आणि विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग असून, श्रद्धा आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल नेहमीच फॅन्सला सांगत असते. पण यामध्ये अभिनेत्री तिच्या वैयक्तिक जीवनातील कोणत्याच गोष्टी कुणाशी शेअर करत नाही. मुळात श्रद्धाचा तसा स्वभाव देखील नाही. आणि म्हणूनच अभिनेत्रीला कोण तिच्या वैयक्तिक जीवना संबंधित प्रश्न विचारले की, ती यावर उत्तर देणे टाळते. नुकतंच तिच्यासोबत असा एक प्रसंग घडला की ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच भडकली असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिच्या संयमाचा बांध सुटल्याचं दिसून आलं.
झालं असं की, श्रद्धाने नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी मुलाखत घेणाऱ्याने श्रद्धाला तिच्या डेटिंग लाइफबद्दल प्रश्न विचारला. “आम्ही अभिनेता कार्तिक आर्यनला विचारलं की त्याला कोणत्या हिरोइनला डेट करायला आवडेल आणि त्याला चार पर्याय देण्यात आले. त्यात तुझंही नाव होतं. पण कार्तिकने सांगितलं की चारही अभिनेत्री दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहेत. त्याने याचा खुलासा केला आहे. तर हे खरंय का?”, असा प्रश्न श्रद्धाला विचारण्यात आला.
हा प्रश्न ऐकताच श्रद्धा उपरोधिकपणे म्हणते, “ओके, त्याला जे म्हणायचं होतं तो ते म्हणाला. तुमच्याकडे इथे माझ्यासाठी काही प्रश्न आहेत का?” तिच्या अशा प्रतिक्रियेनंतरही मुलाखतकर्ता तिला डेटिंग लाइफबद्दल प्रश्न विचारतो. तेव्हा श्रद्धा वैतागते आणि त्यालाच प्रतिप्रश्न करते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट दिसून आला होता. श्रद्धा सहसा तिच्या खासगी आयुष्याविषयी सहसा मोकळेपणे व्यक्त होत नाही. आणि म्हणून अभिनेत्री सध्या यशाच्या उंच शिखरावर पोहचली आहे.
Post a Comment