नगरमध्ये २ शिलेदारांना मनसेची उमेदवारी जाहीर



माय नगर वेब टीम 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी (दि.२२) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. कर्जत जामखेड मधून रविंद्र कोठारी व श्रीगोंदा मधून संजय शेळके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सोमवारी मनसेकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लढत रंगणार आहे.

राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतील बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. काही उमदेवारांसाठी त्यांनी सभा देखील घेतल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी आता विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. 

राज ठाकरे महायुती, महाविकास आघाडी तसेच इतर कोणत्याही पक्षाला देणार नसल्याचे राज ठाकरे यांनी मागेच जाहीर केले. राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाच्या विधानसभेला महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती या तीन मोठ्या आघाड्या असून इतर काही पक्ष एकटे लढत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post