मोठी बातमी : उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली; ‘मविआ’त कोणत्या पक्षाचे किती उमेदवार? पहा सविस्तर



माय नगर वेब टीम 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. सर्वपक्षीय उमेदवारांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर आता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. 


महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला –


शिवसेना UBT = 96

काँग्रेस = 102

राष्ट्रवादी SP = 87


या तीन पक्षांच्या मिळून 285 जागा होतात. यात 5 ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. म्हणजे 280 जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. ऊर्वरीत 8 या जागा मित्र पक्षांसाठी सोडल्याचे दिसते आहे.


महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी दोन पक्षांनी अर्ज भरले आहेत त्यामध्ये, मिरज, सांगोला, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, परांडा, दिग्रस, यांचा समावेश आहे.


मिरज –

शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते

काँग्रेस – मोहन वनखंडे


दक्षिण सोलापूर-

काँग्रेस – दिलीप माने

शिवसेना ठाकरे गट – अमर पाटील


पंढरपूर-

काँग्रेस भागीरथ भालके

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंत


परांडा-

शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे


दिग्रस –

शिवसेना ठाकरे गट – पवन जैस्वाल

काँग्रेस -माणिकराव ठाकरे


सांगोला –

शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे

शेकाप – बाबासाहेब देशमुख

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post