अखेर राणीताई लंकेंचं ठरलं; सामान्य कार्यकर्त्यांनी आणला लंके यांचा एबी फॉर्म !



माय नगर वेब टीम 

पारनेर : सर्वसामान्य जनता हेच माझे कुटूंब माणून समाजकारण, राजकारण करणाऱ्या खा. नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राणीताई लंके यांचा एबी फॉर्म आणण्यासाठी त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यालयात पाठवित कार्यकर्त्यांवरील विश्‍वास अधोरेखीत केला. 

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची उमेदवारी राणीताई लंके यांना पूर्वीच निश्‍चित करण्यात आली होती. निवडणूक जाहिर झाल्यानंतरही त्यांचेच नाव आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रसची यादी जाहिर होण्यापूर्वीच मंंगळवारी लंके यांचा एबी फॉर्म पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आदीती नलावडे यांनी सकाळी दहा वाजता पक्ष कार्यालयात लंके यांचे सहकारी सुरेश धुरपते, गोरख आहेर, गोविंद साबळे, दिलीप कोरडे, संजय बाबर, सुरेश ढवण, त्रिंबक  ठुबे, सुभाष गायकवाड, नाना गाडगे, बाळासाहेब ठुबे, शिवाजी वाफारे, अशोक वाफारे, शहाजी आवारे, नीलेश शिंदे, नितीन कवडे, दता वाबळे, सुनील पानमंद, अय्याज पठाण, विजय कानसकर, दादाभाऊ कावरे यांच्याकडे सूपूर्द केला. 

     एबी फॉर्म मिळाल्यानंतर लंके यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे सुरू असलेल्या बुथ कमिटीच्या बैठकीत तो उमेदवार राणीताई लंके यांच्याकडे सपूर्द करण्यात आला. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post