शहरातील शेकडो मेहतर समाजातील नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर – शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नालेगाव, भिंगार, वसंत टेकडी, सिद्धार्थनगर, सावेडी, पाईपलाईन रोडसह विविध भागांमधील वाल्मिकी मेहतर समाजातील शेकडो महिला व नागरिकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षात मध्ये प्रवेश केला. माजी आमदार अरुण जगताप यांनी पक्षाचे उपरणे घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विश्वास जुना...संग्राम भैय्या पुन्हा... अशा घोषणा देण्यात आल्या.


            यावेळी आ,अरुण जगताप म्हणाले, नगर शहर बदलण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या माध्यमातून आ.संग्राम जगताप यांनी शहराला वेगाने विकासाच्या वाटेवर नेले आहे. या विकासाच्या मुद्यावरच आ.संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभा लढवत आहेत. शहरातील सर्व स्तरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यास आ.जगतापांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व जनतेच्या आशीर्वादाच्या व विश्वासाच्या बळावरच ते पुन्हा निवडणूक लढवत आहे. मेहतर समाजातील शेकडो नागरिकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून आ.जगतापांचे हात बळकट केले आहेत.


            यावेळी मुन्नाबाई चावरे यांनी मनोगत व्यक्त करतना सांगितले की, अहिल्यानगर शहरात आ.संग्राम जगताप यांनी जी विकास कामे केली आहेत एवढे विकास कामे याधी कोणीही कधीच केली नाहीयेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या विकास कामांनी आम्ही प्रभावित झालो आहोत. आ.जगतापांनी मेहतर समाजाच्याचेही अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळेच त्यांना मेहतर समाज पाठिंबा देत आहोत.


            यावेळी उपस्थित नागरिकांनी आ.संग्राम जगताप यांनी मेहतर समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्या बद्दल आभार मानले. तसेच भिंगार शहरात वाल्मिकी प्रवेशद्वार मंजूर केल्याबद्दलही आ.जगताप यांचे आभार मानले.


            यावेळी यावेळी मेहतर समाजाचे अनिल तेजी, बिल्लू घावरी, पै.लक्ष्मण सारसर, पै.अनिल वाणे शक्ती सोहत्रे, राजेश सोहत्रे, संदीप करोलीया, तुषार करोलीया, गौरव चावरे, रवी मोरकरोसे, किशोर माने, अनुप चव्हाण, जगदीश कुडिया, मुन्नाबाई चावरे आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो मेहतर समाजातील कार्यकर्त्यांनी व महिलांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


या कार्यक्रमास छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, प्रवीण घावरी, प्रमोद आठवल, विशाल झुंज, शुभम टाक, रवी गोहेर, राजेश तेजी, रोहित बागडी, सनी खरारे, सचिन बागडी, मनोज बागडी, करण वाणे, हर्षल सारसर, श्रीराज चव्हाण, संदीप लखन, टिंकू चव्हाण, सुमित गोहेल, रितेश निधाने, आशिष तेजी, आकाश करोलीया, बाबासाहेब सारसर आदी उपस्थित होते.


मयूर बांगर यांनी प्रास्ताविक केले तर विशाल बेलपावर यांनी आभार मानले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post