माय नगर वेब टीम
अहमदनगर - मामीचे बाळासह अपहरण करण्याची धमकी देत अल्पवयीन भाचीवर युवकाने अत्याचार केल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात घडली. पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी (10 सप्टेंबर) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर डाडर (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या मामाकडे राहते. ती 30 ऑगस्ट रोजी दुपारी घरी एकटीच असताना ईश्वर तेथे आला. त्याने तिच्या कडे शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. फिर्यादीने त्याला नकार दिला असता त्याने ‘तुझी मामी एकटीच बाळाला घेवून गेली आहे. तु जर मला तुझ्या सोबत शारिरीक संबंध करू दिले नाही तर मी माझ्या मित्राला सांगून तुझ्या मामीला कीडनॅप करू शकतो’ अशी धमकी दिली. त्याने त्याच वेळी फिर्यादीचे तोंड बंद करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
यासंदर्भात फिर्यादीने तिच्या मामाला सांगितले असता 5 सप्टेंबर रोजी ईश्वरने फिर्यादीला तिच्या विद्यालयात गाठले व मामाला सांगितल्यावरून ‘आता बघ मी तुझ्या मामीचे काय करतो ते’ अशी धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या पीडिताने झालेला सर्व प्रकार तिच्या मामा -मामीला सांगितला. मामासह मंगळवारी रात्री कोतवाली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरून ईश्वर डाडर विरोधात अत्याचार, पोक्सो कमलानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Post a Comment