'संपदा'च्या ठेवीदारांना मोठा दिलासा, पैसे मिळणार पण...कर्जदारांच्या मालमत्ताही करणार जप्त; अवसायक मंडळाकडून कायदेशीर कारवाईला झाली सुरूवात

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वाफारेसह १० जणांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचे स्वागत करतानाच 'त्यांना शिक्षा झाली हे ठिकच पण आमच्या ठेवींचे काय?' अरसा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. ठेवीदारांच्या प्रश्नाचे उत्तर अवसायक मंडळाच्या कामकाजातून मिळणार असून संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून त्यातून ठेवीदारांच्या रकमा परत करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती अवसायक मंडळाने दिली आहे. त्यामुळेच ठेवीदारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.


संपदा पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सन २०११ मध्ये संबंधित पदाधिकारी आणि संचालक मंडळानर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संस्थेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली होती. संस्थेत ठेवीदारांच्या सुमारे ३२ कोटीच्या ठेवी अडकल्या असून प्रशासकीय काळात काही प्रमाणात वसूली होऊन त्यातून ठेवींच्या रकमा परत करण्याची कार्यवाही करण्यात आली. मागील दोन वर्षात २ ते ३ कोटी रुपयांच्या ठेवींची रकम परत करण्यास अवसायक मंडळाला यश आले आहे. मात्र अद्यापही २८ ते ३० कोटी रूपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. ठेवींची रक्कम परत मिळण्यासाठी ठेवीदारांना आतापर्यंत मोठा संघर्ष करावा लागला आहे. हा संघर्ष चालू असतांनाच अनेक ठेवीदार मयत ही झाले आहेत. अनेक ठेवीदार वृध्द असून त्यांना दवापाण्यासाठी आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालाने ठेवीदारांना ठेवी परत मिळू शकतात, अशी एक नवी आशा निर्माण झाली आहे. त्यासाठी सध्याचे अवसायक मंडळ प्रयत्नशिल आहे.


संस्थेवर सहाय्यक निबंधक डी.ए. घोडेचोर यांच्या अध्यक्षतेखाली अवसायक मंडळ नियुक्त अनुन या अवसायक मंडळाने संचालक, कर्जदारांवर कायदेशीर कारवाईचा


मार्ग अवलंबत वसूलीवर भर दिला आहे. म्हणजे संस्थेची स्वतःची कोणतीही मालमत्ता नाही, त्यामुळे दोषी संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढवणे, त्या जप्त करून त्याचा लिलाव करणे आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या रकमेतून ठेवींच्या रकमा परत करणणे हा पर्याय अवलंबण्यात येत आहे. त्याचबरोबर धकबाकीदार कर्जदारांच्या मालमता जात करून त्याचा लिलाव केला जाणार असून त्यातून कर्जाची वसूली केली जाणार आहे. विशेष म्हणजे विनातारण जे कर्जवाटप झाले आहे, त्या कर्जाची वसुली करणे अवसायक मंडळासमोरील मोठे आव्हान आहे. त्यात कोणतीही मालमत्ता तारण नसल्याने वसूली कशी करायची? हा प्रमुख प्रश्न आहे.


दरम्यान संचालकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मालमत्ता जप्ती, लिलाव ही प्रक्रिया राबविण्यात येत असून ही प्रक्रिया किचकट असल्याने त्यास मोठा अवधी जात आहे. ठेवीदारांनी अशा लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा, लिलावातून रकमा वसूल करून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाणार आहेत. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवून कार्यवाही केली जात असल्याचे अवसायक मंडळाचे अध्यक्ष श्री. घोडेचोर यांनी सांगितले.

ठेवी बुडणार नाहीत 

संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्याची लिलाव प्रक्रिया राबविली जात असून, त्यातून येणाऱ्या रकमेतून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाणार आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणाच्या ठेवी बुडणार नाही. सर्वांना त्यांची ठेव रक्कम परत मिळेल, ही आमची हमी आहे. ठेवीदारांनी त्यांच्या देव पावती संस्थेच्या कार्यालयात आणून द्याव्यात तसेच लिलाव प्रक्रियेतही सहभाग घ्यावा, असे आवाहन ठेवीदारांच्या वकिल अॅड. अनिताताई दिघे यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post