माढ्यात पवारांविरोधात भाजपचा नवा डाव

 


माय अहमदनगर वेब टीम 

बारामती : माढा लोकसभेत विजय मिळवणे, 2019 च्या तुलनेत भारतीय जनता पक्षाला कठिण झाल आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीलाही विरोध केला आहे. शिवाय, सर्वांत महत्वाची बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुतण्याने भाजपची साथ सोडत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चारीबाजूंनी भाजपची कोंडी झालीये. मात्र, आता भाजपने डॅमेज कंट्रोलसाठी पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. भाजपने माळशिरसमध्ये उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याची माहिती भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी दिली आहे. 


धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करीत असताना माढा लोकसभा टिकवण्यासाठी भाजपासाठी उत्तम जानकर यांचे महत्व वाढले आहे. उत्तम जानकर आजवर मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक राहिले आहेत. मात्र, आता उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांसोबत जाण्याचे संकेत एबीपी माझाशी बोलताना दिले आहेत. मात्र, आता भाजपनेही त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केलेत. त्यामुळे उत्तम जानकर कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशातच राम सातपुते यांनी  जानकर यांच्याशी चर्चा सुरु असून लवकरच गोड बातमी येईल,असा दावा केला आहे . 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post