दुकानाचे शटर तोडून रोकड लांबावली, नगरमध्ये 'या' भागात घडली घटनामाय अहमदनगर वेब टीम 

 अहमदनगर  - किराणा दुकानाचे शटर तोडून 90 हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना आगरकर मळ्यातील शिवनेरी मार्ग परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बाबुलाल कटारीया (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे.

कटारीया यांचे आगरकर मळ्यातील घराच्या समोरील बाजूला शांती डिपार्टमेंटल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर नावाचे किराणा दुकान आहे. त्यांनी मंगळवारी (दि. 9) सकाळी सहा वाजता दुकान उघडले होते. दिवसभराचे काम करून आठवडाभराचे जमलेले 90 हजार रूपयांची रोकड त्यांनी कॅश काऊंटरमध्ये ठेऊन ड्रॉवर लॉक केले होते. रात्री 11 वाजता दुकान बंद केले. दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि. 10) सकाळी सहा वाजता ते दुकानात गेले असता त्यांना शटरचे कुलूप तुटलेले व दुकानातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. त्यांनी दुकानातील कॅश काऊंटरचे ड्रॉवर तपासले असता त्याचे लॉक तुटलेले दिसले. त्यातील 90 हजाराची रोकड चोरीला गेल्याचे कटारीया यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. कटारिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार पालवे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post