कलियुगात राम कथेतील विचार आत्मसात करावे : रामायणाचार्य कदम महाराज

 


वाळकीत श्रीराम जन्मोत्सवास रामकथा ने प्रारंभ

माय अहमदनगर वेब टीम 

        अहमदनगर - जीवनातील असंख्य व्यथा रामकथा श्रवण केल्याने दुर होतात . मानवाने जीवनात संधी मिळण्याची प्रतिक्षा करण्यापेक्षा मिळालेल्या संधीचे सोने करत आपले जीवन सुखकर अन् समाधानी बनवावे . रामायण कथेतून बंधु प्रेम , पत्नी प्रेम , माता पित्यांची आज्ञा , सत्यवचन याची शिकवण आपणास मिळते . रामकथा श्रवणाने मनशांती , समाधान मिळते . त्यामुळे कलियुगात रामायण कथेतील विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचा उपदेष रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी दिला .

          नगर तालुक्यातील वाळकी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास तुलशी रामायण कथेने मोठ्या थाटात प्रारंभ करण्यात आला . रामकथा सात दिवस चालणार असून श्रीरामांच्या जीवनातील प्रसंग संगितमय कथेतून आपल्या रसाळ अमृतमय वाणीतून रामायणाचार्य नाना महाराज कदम उपस्थित श्रोत्यांसमोर उलगडणार आहेत . कथेतील पहिले पुष्प गुंफतांना रामकथा आत्मसात करण्याचा उपदेष त्यांनी उपस्थित श्रोत्यांना दिला .

          वाळकी करांचे दैवत समाधिस्त महेंद्रनाथजी महाराज यांच्या अर्धांगिणी गुरुमाता सुभद्रा काकू यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करत रामकथेस प्रारंभ करण्यात आला . यावेळी महेंद्रनाथजींचे शिष्य , नाथभक्त उपस्थित होते . श्रीराम जन्म सोहळ्यासाठी नाथसेवाच्या स्वयंसेवकांनी परिसरात स्वच्छा , सुशोभिकरण , विद्युत रोषणाई केली असून गेल्या महिनाभरापासून कार्यक्रमाच्या तयारीसाठी परिश्रम घेतले .

दि . १० ते १६ पर्यंत तुलशी रामायण कथा चालणार आहे . दि . १७ रोजी श्रीराम मंदिरात सकाळी महाअभिषेक , होमहवन , ९ ते १२ राम जन्मानिमित्त हभप नाना महाराज कदम यांचे काल्याचे किर्तन होणार आहे . दुपारी १२ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्म सोहळा साजरा होणार आहे . दुपारी महाप्रसाद , सायंकाळी श्रीराम प्रतिमेची रथातून मिरवणूक आणि रात्री शोभेच्या दारुकामाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे .

      परिसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथसेवा च्या वतीने करण्यात आले .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post