आम आदमी पार्टीला मोठा धक्का, ईडीने थेट मुख्यमंत्र्यांनाचं केले अटक, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर



माय अहमदनगर वेब टीम 

नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय. ईडीच्या टीमने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आधी त्याच्या घराची झडती घेतली आणि नंतर त्याची चौकशी केली, यानंतर तपास यंत्रणेने त्यांना अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. 

दरम्यान आज ईडीचे अधिकारी शोध वॉरंट घेऊन तपास यंत्रणेचे पथक केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली पीएमएलएच्या कलम ५० अंतर्गत मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवण्यात आला त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय.


ईडीच्या पथकाने केजरीवाल यांना काही प्रश्न केली. केजरीवाल यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल देखील यावेली जप्त करण्यात आले होते. प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अटकेच्या कारवाईची माहिती दिलीय. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणेविरोधात घोषणाबाजी केलीय. दरम्यान दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर कलम १४४ लागू केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post