आदिती धामणे मेकअप आर्टिस्ट अँड अकॅडमीचा शानदार शुभारंभ



 माय अहमदनगर वेब टीम 

पुणे -  पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर परिसरात सोमवार दि. 11 मार्च रोजी आदिती धामणे मेकअप आर्टिस्ट अँड अकॅडमीचा शानदार शुभारंभ मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, भाजपच्या नेत्या कुंदाताई संजय भिसे, सारोळा कासारच्या माजी सरपंच अर्चनाताई धामणे, वडील राजू धामणे यांच्या हस्ते झाला.



यावेळी आदिती धामणे मेकअप आर्टिस्ट अँड अकॅडमीचा संचालिका आदिती धामणे यांना मान्यवर नाना काटे, कुंदाताई भिसे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नाना काटे, कुंदाताई भिसे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.



याप्रसंगी उद्योजक रघुनाथ चोभे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रियवंदा संजय धामणे, एपिआय सचिन धामणे, ,राजेंद्र कोठुळे, माऊली लंके, प्रदीप भापकर, प्रवीण गिरवले, मंगेश धामणे,वैभव कडूस, संग्राम वाघ, अनिरुद्ध संजय धामणे, अशोक धामणे, अजित पाटील, अशोक ठोकळ, प्रशांत हराळ, संतोष भोसले,  वैष्णवी कोठुळे, शामल भोसले यांच्यासह पंचक्रोषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सद्य:स्थितीत अनेक वेळा साधेपणा म्हणजे भोळेपणा किंवा गबाळेपणा समजला जातो. अत्याधुनिकीकरण आणि काही प्रमाणात अंधानुकरण यामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असतात. हे होणारे बदल एका अर्थी आपला विकासच घडवत असतात. आपलं केवळ नीटनेटकं राहणं हे पुरेसं नसून आपण चारचौघांमध्ये वेगळं आणि आकर्षक दिसणं आवश्यक झालं आहे. मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या तरीही केवळ सुंदर असणंसुद्धा पुरेसं नसून आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटकं राहणं आवश्यकच असतं. यामुळेच सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी काही जणांचा कल असतो.



काही वेळा काळाची गरज म्हणून, तर कधी आवड म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जात असतो. अर्थातच, अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर प्रत्येकाला घरी करणं शक्य होतंच असं नाही, अथवा जरी शक्य असेल तरीही नेहमी ते घरी जमेलच असं नाही. अशा वेळी निश्चितच व्यावसायिक ब्युटी पार्लरकडे धाव घेतली जाते. हल्ली अशी ब्युटी पार्लर्स आपल्याला दिसून येतात.



आपण सुंदर दिसावं असं वाटत नसणारी व्यक्ती सापडणं विरळच! या सौंदर्याचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. आपल्या सौंदर्याची वाहवा व्हावी, इतरांपेक्षा आपलं व्यक्तिमत्त्व वेगळं असावं अथवा तसं ते दिसावं, ते सर्वामध्ये खुलून दिसावं असं वाटणारी प्रत्येक व्यक्ती पार्लरच्या ब्युटीफुल लुकवर फिदा झाल्याशिवाय राहात नाही, असे संचालिका आदिती धामणे यांनी सांगितले.

खास महिलांच्या आग्रहास्तव पिंपळे सॊदागर परिसरात आदिती धामणे मेकअप आर्टिस्ट अँड अकॅडमीचा शुभारंभ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी, मुलींनी आदिती धामणे मेकअप आर्टिस्ट अँड अकॅडमीचा आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संचालिका आदिती धामणे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post