दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बेदम मारहाण ; अहमदनगरमध्ये घडला प्रकारमाय अहमदनगर वेब टीम 

 अहमदनगर  - दारू पिण्याच्या वादातून दोघांत वाद झाले. एकाने दुसर्‍याला लोखंडी गज व गलोरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना नगर तालुक्यातील मदडगाव शिवारात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हरिभाऊ भिकाजी येरकळ (वय 70 रा. मदडगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भाऊसाहेब ऊर्फ बाबाश्या बबन बर्डे (रा. मदडगाव) याच्या विरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 27) सायंकाळी बर्डे याने येरकळ यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यांनी दिले नाही म्हणून बर्डे याला राग आला. रागात बर्डे याने येरकळ यांना लोखंडी गजाने मारहाण करून खिशातील 48 हजार रूपये काढून घेतले. गलोरने डोक्यात, कानावर गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

भाऊसाहेब बबन बर्डे (वय 31 रा. मदडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरीभाऊ भिकाजी येरकळ (रा. मदडगाव) याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी बर्डे व येरकळ हे दोघे हॉटेल महाराजापासून मदडगावकडे जात असताना येरकळ हा बर्डे यांना म्हणाला, पुन्हा दारू पिण्यासाठी चल’, बर्डे यांनी नकार देताच त्याने लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post