नगरमध्ये भर कार्यक्रमात राडा! विखे-लंके समर्थक भिडले



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : सावेडी उपनगरातील बंधन लॉन या ठिकाणी एका खाजगी वृत्त वाहिनीचा टॉक शो सुरू होता. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. सुजय विखे यांचे बॅनर हातामध्ये घेऊन धुडगूस घातला. महिला भगिनींना धक्काबुक्की केली. जे महिलांचा सन्मान करू शकत नाहीत, गुंडगिरी करतात त्यांना लोकशाही मान्य नाही, असा गंभीर आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. मीडियाला देखील यामध्ये टार्गेट केल गेलं. प्रसार माध्यमांची आशा पद्धतीनं गळचेपी करणे याचा निषेध आम्ही काँग्रेसच्या वतीने करत असल्याचे काळे म्हणाले. 


या कार्यक्रमा दरम्यान मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. यावेळी महायुती, महाविकास आघाडी यासह इतर पक्षांचे त्याचबरोबर मराठा मोर्चा संघटनेचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम सुरू झाला आणि अवघ्या पहिल्या पाच मिनिटां मध्येच मोठ्या गोंधळाला सुरुवात झाली. 

याबद्दल किरण काळे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. काळे म्हणाले, प्रसार माध्यमं हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांचा अनादर अयोग्य आहे. भारतीय जनता पार्टीकडे द्यायला उत्तरे नाहीत.भाजपच्या पाया खालची वाळू सरकली आहे. प्रसार माध्यमांचा समोरच इन कॅमेरा लाईव्ह धुडगूस घालण्या पर्यंत यांची मजल गेली आहे. पुण्यात देखील निर्भय बनोच्या सभेपूर्वी निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांवर देखील भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पोलीस बंदोबस्तात जीवघेणा हल्ला केला होता. तशाच पद्धतीचा किळसवाणा धुडगूस नगर शहरामध्ये भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी घातल्याचा आरोप काळे यांनी काँग्रेसच्या वतीने केला आहे. 

ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या आ. गणपत  गायकवाडने पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार केला, एकाने फेसबुक लाईव्ह येऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा खून केला. हे महाराष्ट्राने कधी यापूर्वी पाहिले नव्हते. महाराष्ट्राचा बिहार होताना दुर्दैवाने पहावे लागत आहे. नगर दक्षिणेत देखील भारतीय जनता पार्टीची गुंडगिरी  वाढली आहे. नगर शहरात गुंडांचा सहवास त्यांना पाच वर्षे लाभल्यामुळे वाण नाही पण गुण लागला असं म्हणण्याची वेळ आली असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. 

महिलांना बोलू दिल नाही : 

पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे म्हणाल्या की, यावेळी महिलांना बोलू दिले गेले नाही. महिलांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांना देता आली नाही. त्यांची भांबेरी उडाली. भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली. महिलांचा सन्मान न ठेवणे ही यांची संस्कृती आहे. राष्ट्रवादीच्या सायली चेडे म्हणाल्या, मी महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मला सुद्धा बोलू दिले नाही. भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केली. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post