खा.विखे यांची माहिती...
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर धरणातील येत्या१२ मार्च पासून रोटेशन सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिली.
याप्रश्नी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार बबनराव पाचपुते आणि जिल्हाधिकारी सिद्ध राम सालिमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय झाला.
विसापुर धरणातून आवर्तन सोडण्याबाबत लाभधारकांनी वेळोवेळी केलेल्या मागणी मुळे विसापूर धरणातून २०० द ल घ फू पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. खा. डॉ.विखे आणि आ. पाचपुते यांनी दिलेल्या सूचनेनूसार निर्ण्य घेण्यात आला.
या भागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगत विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी, शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील २१०० हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन खा. डॉ.सुजय विखे यांनी केले.
Post a Comment