रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार!; 'ते' विधान भोवणार, विखे पाटील म्हणाले...रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू 

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - राज्यात माेठ्या प्रमाणावर तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्यावर तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. आता रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्याचं विखे म्हणाले आहेत.

नगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मंत्री विखे पाटील म्हणाले, ''पवार यांना पुरावे नसताना काहीही बाेलण्याचे लायसन्स मिळाले आहे का?. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवानं परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा,'' असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post