टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये 'यांना' संधी नाहीच; संपूर्ण वर्ल्ड कप बेंचवरच...



स्पोर्ट डेस्क -

विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने मिशन वर्ल्डकपच दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात पाचवेळच्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला धुळ चारली. तिसऱ्या सामन्या पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तनचा पराभव करत विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अजिंक्य राहाण्याचा विक्रम नोंदवला. या तीनही सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी वरचढ ठरलीय. विश्वचषकाच्या पुढच्या सामन्यातही टीम इंडियाचा हाच फॉर्म कायम राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


पहिल्या तीन सामन्यात एक दोन बदल वगळता टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. खेळाडूंची चांगली केमिस्ट्री जुळून आली. त्यामुळे पुढच्या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात बदल करण्याची शक्यता फारच कमी आहे. अशात भारताचा अनुभवी वेगवागन गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. वर्ड क्लास गोलंदाज असतानाही पहिल्या तीन सामन्यात शमीला संघात संधी मिळेलाली नाही. वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत शमीने एका सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या.


टीम इंडियात वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज नव्या चेंडूने जबरदस्त सुरुवात करुन देत आहेत. तर तिसऱ्या गोलंदाजाची कमी ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पूर्ण करतोय. चौथ्या वेगवान गोलंदाजासाठी शार्दुल ठाकूरला संधी दिली जात आहे. गोलंदाजीबरोबरच आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी शार्दुल उपयुक्त ठरू शकतो. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी कमाल करतेय,  त्यांना संघातून बाहेर बसवणं शक्यच नाही. त्यामुळे या कॉम्बिनेशनमध्ये शमीला सध्यातरी कुठेच जागा दिसत नाही.


मोहम्द शमीबरोबरच आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवलाही प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळणं कठिण आहे. श्रेयस अय्यर पुन्हा फॉर्मात आलाय आणि पाचव्या क्रमांकावर तो मॅचविनर ठरतोय. तर शुभमन गिलची एन्ट्री झाल्याने सलामीचा प्रश्नही सुटला आहे. याशिवाय विराट कोहली, केएल राहुल यांना बाहेर बसवण्याचा विचारही टीम इंडिया करु शकत नाही. त्यामुळे मोहम्मद शमीबरोबरच सूर्यकुमार यादवलाही विश्वचषक स्पर्धेचे सामने बेंचवर बसूनच पाहावे लागणार आहेत. 


टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळपटटीनुसार बदल झालाच तर शार्दुल ठाकूरच्या जागी अनुभवी आर अश्विनला जागा मिळू शकते. तर शुभमन गिलऐवजी ईशीन किशन हा एकच पर्याय आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात तरी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल पाहिला मिळणार नाहीत. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post