माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- -गेल्या कित्येक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या निंबळक येथील दत्त मंदिर चौकाचे भव्य असे सुशोभीकरण करण्यात आहे. सुशोभीकरणानंतर निंबळक चा मुख्य चौक ग्रीन अँड क्लीन बनला असुन बुधवार दि. २२ रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी दिली.
चौकाच्या सुशोभीकरणासाठी३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. दत्त मंदिर चौकाचे सुशोभिकरणाचे निंबळक कराचे स्वप्न आता पुर्ण झाले आहे. येथील दत्त मंदिर चौक परिसर हा गावातील मुख्य चौक आहे. एमआयडीसी , मनमाड, पुणे, कल्याण महामार्गाला जाण्यासाठी या चौकातून जावे लागते. येथे चोवीस तास रहदारी तसेच वर्दळ असते. या चौकात अतिक्रमण झाल्यामुळे या चौकाचा श्वास कोंडला होता. या चौकाचे विद्रूपीकरण झाले होते. अपघाताचे प्रमाण ही वाढले होते.
कामाचा शुभारंभ रविवार दि ४ रोजी करण्यात आला होता. तेव्हापासून येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती. चौक सुशोभीकरणाचे काम पुर्ण झाले असून नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या चौक सुशोभीकरणाचा मास्टर फ्लॅन तयार करण्यात आला होता. चौकात चहुबाजूने नारळाची झाडे लावुन मध्यभागी गोल आकाराचे सर्कल केले गेले आहे. निंबळक येथील मुख्य चौकाचे सुशोभीकरण करण्यात आल्याने गावच्या वैभवात भर पडली असुन नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे
______________________________
निंबळक येथील दत्त मंदिर चौकाचे सुशोभीकरण झाल्यानंतर गावची शोभा वाढलेली आहे. सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायत कार्यालयास सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, जेष्ठ नागरिक तसेच निंबळक ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार.
.....सौ.प्रियंका लामखडे (सरपंच, निंबळक)
__________________________
Post a Comment