डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची समाजाला गरज- विजय पाटोळे भीमशक्ती संघटने कडून सामाजिक एकतेचे दर्शन ; जेऊर परिसरात महामानवाला अभिवादन

माय अहमदनगर वेब टीम



 नगर तालुका-   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटोळे यांनी केले.

         भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भिम शक्ती संघटनेचे अध्यक्ष संगम पाटोळे, विजय पाटोळे मित्र मंडळ तसेच आरपीआयचे अध्यक्ष अमोल पाटोळे यांच्या वतीने संयुक्तिकरित्या साजरी करण्यात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना विजय पाटोळे यांनी आज समाजाला  बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी. समाजात विविध गट तट पडले आहेत. सध्या जाती धर्मावरून, विविध रंगावरून एकमेकांशी लढून आपलेच रक्त आपण सांडत आहोत, हे दुर्दैवी आहे. युवकांच्या हाती दगड काठी न देता बाबासाहेबांचे चरित्र वाचण्यास द्यावे, असेही पाटोळे यांनी सांगितले.

    भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष संगम पाटोळे यांनी सांगितले की, बाबासाहेबांच्या मनातील समतेचा, बंधुतेचा भारत निर्माण करण्यासाठी आपसातील भेदभाव नष्ट करून समतेचा प्रचार, प्रसार करावा. यासाठी सर्व जाती धर्मांना एकत्र घेत जयंती साजरी करण्यात आली. रंग धर्मावरून होणारे वाद टाळावेत यासाठी सर्वच रंगाचे ध्वज यावेळी लावण्यात आले होते. अमोल पाटोळे यांनी सांगितले की येथील जयंतीने तालुक्यात नवीन आदर्श निर्माण केला आहे.



            याप्रसंगी सरपंच सौ. ज्योती तोडमल, बंडू पवार, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, अंबादास पवार, भास्कर मगर, अन्वर शेख यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब तोडमल, बाळासाहेब पाटोळे, सुनील जावळे, संभाजी तोडमल, गोरख काळे, सोमनाथ टिमकरे, संतोष काळे, संदीप टिमकरे, भरत तोडमल, अनिल ससे, आदिनाथ बनकर, आकाश तोडमल, बबन पाटोळे, सनी गायकवाड, मायकल पाटोळे, सागर पाटोळे, विशाल पाटोळे, किरण पाटोळे, सुरज भिंगारदिवे, नंदू पाटोळे, अविनाश पाटोळे यांच्यासह सतीश थोरवे मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       जेऊर परिसरात ठिक- ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ज्योती तोडमल व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत महामानवास अभिवादन करण्यात आले. इमामपूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भीमराज मोकाटे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. तसेच धनगरवाडी, ससेवाडी, बहिरवाडी, खोसपुरी, पांगरमल येथेही आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.



        जेऊर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. तसेच अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने विकी वाघमारे, सुनील वाघमारे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे आकाश वाघमारे, प्रणव वाघमारे, प्रेम वाघमारे, विनोद वाघमारे, बाबासाहेब वाघमारे, ऋतिक वाघमारे उपस्थित होते.

_________________________

वृक्षारोपण करण्याचा नवीन संकल्प

 विजय पाटोळे मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक सदस्याचा वाढदिवस हा वृक्षारोपनाने साजरा करण्यात येणार आहे. तसा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने करण्यात आला असल्याची माहिती फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष मायकल पाटोळे यांनी दिली.

______________________________

सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्याचा पायंडा

जेऊर परिसरात सर्व महापुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणत साजरा करण्याचा पायंडा विजय पाटोळे व भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष संगम पाटोळे यांनी पाडलेला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जेऊर पंचक्रोशीतून कौतुक करण्यात येत आहे.

____________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post