संतांचे विचार आचरणात आणल्यास समाजाची प्रगती - बंडु पवार जेऊर येथे संत गोरोबा पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न

  माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका-संतांचे विचार आचरणात आणल्याने स्वतःबरोबरच समाजाची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन जेऊर गावचे माजी उपसरपंच बंडू पवार यांनी व्यक्त केले आहे.



        जेऊर येथे मंगळवार दि.१८ रोजी जगद्गुरु श्री संत गोरोबा काका यांची ७०६ व्या  पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत गोरोबा यांच्या प्रतिमेचे पूजन बंडू पवार, श्रीतेश पवार, अरुण विरकर, शशिकांत सोमवंशी, अविनाश सोमवंशी, ह.भ.प. सुभाष महाराज राऊत, गणेश विरकर यांच्या हस्ते करण्यात आले.


        त्याप्रसंगी बोलताना बंडू पवार यांनी सांगितले की, समाजाला आज संतांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. संतांची शिकवण, विचार आचरणात आणल्याने स्वतःबरोबर समाजाची निश्चित प्रगती होत असते. संत संगतीने मानवी जीवनाचा उद्धार होत असतो. त्यामुळे संतांचे विचार आचरणात आणण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प. सुभाष महाराज राऊत यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

      याप्रसंगी यशवंत विरकर,प्रकाश लक्ष्मण विरकर,प्रकाश गणपत विरकर, आदिनाथ विरकर , किरण विरकर,किरण    सोमवंशी,  विक्रम विरकर,  तुषार सोमवंशी,सुनील सोमवंशी,महेश सोमवंशी, पप्पू भोंदे ,संदीप  पवार,कृष्णा तोडमल, पप्पू झीने,शुभम गायकवाड, निलेश  इंगळे,रोहित  तोडमल,सागर कावरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post