जेऊर येथे शिव मल्हार पायी दिंडीचे आयोजन जेजुरी पर्यंत अखंड ज्योत ; भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

 माय अहमदनगर वेब टीम नगर तालुका(शशिकांत पवार)- श्री क्षेत्र जेऊर येथील खंडोबा मंदिर ते जेजुरी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. जेऊर ते जेजुरी शिव मल्हार दिंडीचे हे चौदावे वर्ष आहे.

         मंगळवार दि. २८  मार्च ते गुरुवार दि.६  एप्रिल या कालावधीमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.२८ रोजी दिंडीचे जेजुरीकडे प्रस्थान होणार असून दिंडी दरम्यान जेऊर ते जेजुरी पर्यंत अखंड ज्योत नेण्यात येत असते.

        ममताजी कातोरे व बाबासाहेब मगर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगदेव महाराज मगर यांच्या आशीर्वादाने दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. दीपप्रज्वलन, रथ पूजन, अभिषेक पूजा, ध्वज पुजन असे विविध धार्मिक विधी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. दिंडीमध्ये तोडमलवाडी, वाघवाडी, धनगरवाडी, ससेवाडी, पिंपळगाव उज्जैणी, इमामपूर, शेंडी, आढाववाडी, चापेवाडी सह जेऊर पंचक्रोशीतून भक्त भाविक सहभागी होत असतात.

         दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी नामदेव शिंदे, अजित शेटे, चांगदेव मगर, निवृत्ती ससे यांच्यासह जेऊर ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. तरी शिव मल्हार दिंडी सोहळ्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post