यशश्री अकॅडमी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नवीन वर्षा साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


 आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी जागरूकता निर्माण करुन विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रोत्साहित करणे या उद्देशाने विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या दिवशी विज्ञान प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम यावेळी दिसून आला.


 यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प व कल्पना प्रदर्शित केल्या.या प्रदर्शनाला वरिष्ठांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.शिक्षण क्षेत्रात एकविसाव्या वर्षात पदार्पण करत नावलौकिकास आलेली सीबीएसई मान्यताप्राप्त यशश्री अकॅडमी धनगरवाडी येथे नूतन वर्षा साठी प्रवेशास सुरुवात झाली असल्याची माहिती अकॅडमीच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

__________________

प्रवेशासाठी संपर्क

*  १ली ते१२ वी --९८२२७५६१८२ धनगरवाडी ऑफिस

*  प्ले ग्रुप ते बारावी ---९१४५३१८८२९ सावेडी ऑफिस

________________0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post