गावगाड्याने अनुभवली फंदफितुरी..!



 एकनिष्ठतेच्या अनाभाका घेणाऱ्यांनीच शेवटच्या दिवशी दिल्या हातावर तुरी /नगर तालुक्यात २७ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी ७४७ अर्ज तर सरपंचपदासाठी १५० अर्ज दाखल

अविनाश निमसे / माय अहमदनगर वेब टीम :

नगर तालुक्यात २७ ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १५० अर्ज प्राप्त झाले असून सदस्यपदासाठी ७४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची तहसील कार्यालयासमोर झुंबड उडाली.

दरम्यान नगर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्या बरोबरच अनेक नाट्यमय घडामोडी पहावयास मिळाल्या. यामध्ये प्रामुख्याने गावगाड्यातील फंदफितुरी  अनुभवास आली. काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर असताना अचानक काहींनी फंद फितुरी करून उमेदवारी अर्ज भरले. तर कालपर्यंत आपण पार्टी  प्रमुखांशी एकनिष्ठ असल्याच्या आणाभाका घेणाऱ्यांनी शेवटच्या दिवशी पार्टी प्रमुखांच्या हातावर तुरी देऊन अर्ज सादर केल्याचे पाहवयास मिळाले. तर काही गावात पॅनल प्रमुखांनी राजकारणातील चाण्यक नीती अवलंबत मतांची गोळाबेरीज करून भावकीत भावकीत लढत पेटऊन दिली असल्याचे चित्र स्पष्ट झाले.  तर काही ठिकाणी एकाच पॅनलमध्ये राहून अनेकांनी सरपंच पदासाठी अर्ज भरल्याने पार्टी प्रमुखांची डोकेदुखी वाढवली आहे. तर काहींनी एका पार्टीत राहून एनवेळी दुसऱ्या पार्टीकडून किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काहींनी एकाच कुटुंबातून तीन तीन अर्ज दाखल केल्याने संभ्रम  निर्माण केला आहे. 

परंतु असे असले तरी अंतिम चित्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार असून, तोपर्यंत मानधरणी, साम साम,  दाम आदींचा अवलंब करून इच्छुकांची मने वळविण्यास अवधी असल्याने पुन्हा एकदा राजकीय डावपेच पहावयास मिळणार आहेत.


असे दाखल झाले अर्ज - 

नगर तालुक्यात २७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १५० तर  सदस्यांसाठी ७४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले .यामध्ये वाळकी सरपंच पदासाठी ६ सदस्य ६६ नेप्ती सरपंच पद १० सदस्य ५७, कापूरवाडी ९ सदस्य ४०, नांदगाव सरपंच पद ८ सदस्य २५,  राळेगण सरपंच पद ८ सदस्य ४२, सारोळा कासार सरपंच पद ६ सदस्य ४२, शेंडी सरपंच पदासाठी १० सदस्य५१, जखमगाव सरपंच पद ९ सदस्य २२, नारायण डोह सरपंच पद ११ सदस्य ५६ सोनेवाडी चास सरपंच पद तीन सदस्य २५, टाकळी खादगाव सरपंच पद ५ सदस्य ४१ वडगाव तांदळी सरपंच पद ६ सदस्य २१, आठवड  सरपंच पदासाठी ३ सदस्य३१, अगडगाव सरपंच पद ४ सदस्य २७ खादगाव टाकळी सरपंच पद ७ सदस्य ४२ कैडगाव जाब सरपंच पद ८ सदस्य ३७, बाबुर्डी बेद सरपंच पद ३ सदस्य २१ ,मदडगाव सरपंच पद ३ सदस्य १६, पांगरमल सदस्य सरपंच पद ७ सदस्य१५, पिंपळगाव कवडा सरपंच पद६ सदस्य २०, पिंपळगाव लांडगा सरपंच पद ५ सदस्य २०, रांजणी सरपंच पद ७ सदस्य ३७, साकत सरपंच पद ८ सदस्य २९ , सारोळा बंदी सरपंच पदी ३ सदस्य १५ सोनेवाडी पिला सरपंच पद ५ सदस्य १७, उक्कडगाव सरपंच पद ५ सदस्य २८ दहीगाव सरपंच पद ७ सदस्य ३०.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post