पांगरमल ग्रामस्थांची दिवाळी झाली गोड सरपंच आव्हाड यांच्या पुढाकारातून आनंदाचा शिधा मोफत वाटप

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- नगर तालुक्यातील पांगरमल येथे राज्य सरकारच्या वतीने दीपावली निमित्त देण्यात आलेल्या आनंदाचा शिधा पांगरमल वासीयांना सरपंच बापूसाहेब आव्हाड यांच्या पुढाकारातून मोफत देण्यात आल्याने पांगरमल ग्रामस्थांची दिवाळी गोड झाली आहे.

      राज्य सरकारच्या वतीने दीपावली निमित्त आनंदाचा शिधा म्हणून शंभर रुपयात किराण्याची किट रेशन कार्डधारकांना देण्यात येत होती. परंतु पांगरमल येथे सरपंच बापूसाहेब आव्हाड व देविदास आव्हाड यांनी स्वखर्चाने सर्व ग्रामस्थांना मोफत शिधा वाटप केले आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते शिधा वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     सरपंच बापूसाहेब आव्हाड यांच्या कार्याचे माजी मंत्री कर्डिले तसेच पांगरमल ग्रामस्थांनी कौतुक केले आहे युवा नेतृत्व म्हणून सरपंच आव्हाड हे गाव विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या नेतृत्वाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. गोरगरीब जनतेचे आशीर्वाद तसेच घरोघरी दिवाळीचा आनंद उत्सव साजरा होण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे सरपंच बापूसाहेब आव्हाड व देविदास आव्हाड यांनी सांगितले.

      शिधा वाटप कार्यक्रमासाठी राहुल आव्हाड, नवनाथ आव्हाड, सोपान आव्हाड, सचिन आव्हाड, अंकुश आव्हाड, एकनाथ आव्हाड, महादेव आव्हाड, शिवाजी आव्हाड, सोसायटी चेअरमन गणपत आव्हाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

     याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबन आव्हाड, अमोल आव्हाड, नामदेव आव्हाड, गणेश आव्हाड, संतोष आव्हाड, शरद आव्हाड, सतीश आव्हाड, अजित आव्हाड, सोनू आव्हाड, अशोक आव्हाड, विठ्ठल आव्हाड यांच्यासह पांगरमलचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post