निंबळक येथे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ; ४२ वे वर्ष मैदानी खेळामुळे आरोग्य सदृढ राहते -आमदार निलेश लंके


  माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- आजच्या युगात तरुण पिढी तसेच बालपणीच हातात मोबाईल आल्याने मैदानी खेळ लोप पावत चालले आहेत. मैदानी खेळामुळे आरोग्य सदृढ राहत असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

     नगर तालुक्यातील निंबळक येथे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते आमदार प्राजक तनपुरे, आमदार रोहित पवार, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, युवा उद्योजक अजय लामखडे, सरपंच सौ. प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धा २४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये पार पडणार आहेत.

     याप्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके यांनी मोबाईल मुळे मुले मैदानी खेळ विसरत चालले असल्याची खंत व्यक्त केली. मैदानी खेळ खेळल्यामुळे आरोग्य सदृढ राहत असल्याने आजच्या पिढीने मैदानी खेळाकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा स्पर्धांच्या आयोजन करणे हे गरजेचे आहे. आधुनिकीकरणाच्या काळात खेळाचे मैदानं ही लोप पावत असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.    स्व. संजय लामखडे व स्व. विलासराव लामखडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोस्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन अध्यक्ष अजय लामखडे यांनी केले आहे. प्रथम पारितोषिक ५५ हजार ५५५ रुपये, द्वितीय ४४ हजार ४४४ रुपये, तृतीय ३३ हजार ३३३ रुपये तर चतुर्थ पारितोषिक २२ हजार २२२ रुपये ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर विविध आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

     बक्षीस वितरण समारंभ पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष उद्योजक अजय लामखडे, कार्याध्यक्ष केतन लामखडे, उपाध्यक्ष बाळासाहेब कोतकर, सचिव सुनील जाजगे यांच्यासह स्व. विलासराव लामखडे प्रतिष्ठान, दोस्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व निंबळक ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

      उद्घाटन प्रसंगी व्हाईस चेअरमन अविनाश आळंदीकर, घनश्याम म्हस्के, तोफीक पटेल, नाना दिवटे, अशोक कळसे, सोनवणे सर, पिनू तांबे, इसळक उपसरपंच अमोल शिंदे, अतुल कुलट, गणेश साठे, जयराम खेडकर, सोमनाथ खांदवे, सिताराम सकट यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

____________________________________

 स्पर्धेचे  सलग ४२ वे वर्ष 

निंबळक येथील ग्रीन हिल स्टेडियमवर आयोजित क्रिकेट स्पर्धेचे हे सलग ४२ वेळ वर्ष आहे. अविरतपणे ४२ वर्ष दिवाळीनिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मैदानी खेळ हे व्यायामी खेळ असल्याने मुलांनी मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे.

..... अजय लामखडे ( युवा उद्योजक )

_____________________________

ग्रीन हिल स्टेडियमचा होणार कायापालट

निंबळक येथील ग्रीन हिल स्टेडियमचा कायापालट होण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सुमारे साडेसात कोटी रुपयांचा स्टेडियमचे सुशोभीकरण व कामाबाबत प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील मैदाने लोप पावत आहेत हे दुर्दैव आहे.

....सौ. प्रियंका लामखडे ( सरपंच, निंबळक )

________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post