आत्तापर्यंत धो धो पाऊस, यापुढे कडाक्याची थंडी



माय अहमदनगर वेब टीम 

ऑक्‍टोबर महिना सरत असताना हवामानातही बदल होणार आहे. देशात एकाच वेळी सक्रिय असलेल्या दोन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 10 राज्यांमध्ये थंडी पडेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा सोबतच 6 ते 7 नोव्हेंबर दरम्यान तापमानात झपाट्याने घट होईल. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 11 ते 17 अंशांचा फरक दिसून येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  हवामान खात्याने म्हटले आहे की, सध्या उत्तर आणि पश्चिमेकडून मध्य भारताकडे कोरडे उत्तर-पश्चिम वारे वाहत आहेत. उत्तरेकडील पर्वतरांगांवर बर्फवृष्टी झाल्यानंतर हे वारे बर्फाच्छादित भागातून जातील आणि थंडीने मध्य भारतात पोहोचतील. त्यामुळे 6 नोव्हेंबरपासून देशातील दोन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर ते मध्य भारतात दिवसाही थंडी जाणवेल. 

हा महिना संपताच देशातील हवामानाची दिशाही बदलणार आहे. शिरशिरत्या गारव्याचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत होईल. हवामान विभागानुसार, पुढील एक आठवड्यात देशात दोन पश्चिमी विक्षोभ येणार आहेत. त्यामुळे 6 नोव्हेंबरपासून मध्य भारतापर्यंत दिवसा गारठा राहील. एवढेच नाही तर पुढील चार महिने पहाडी राज्यांपासून मध्य भारतातील राज्यांत कडाक्याची थंडी पडू शकते.


सध्या उत्तर, पश्चिम भारतापासून मध्य भारतापर्यंत शुष्क वायव्य वारे वाहत आहेत. उत्तरेच्या पहाडांवर बर्फवृष्टीनंतर ही हवा बर्फाळ भागांतून जात मध्य भारतापर्यंत गारठा आणेल. 6-7 नोव्हेंबरला पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणपर्यंत तापमानात वेगाने घसरण होईल. दिवस आणि रात्रीच्या तापमानात 11 ते 17 अंश सेल्सिअस एवढा फरक असेल. विशेषत: गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात आकाश निरभ्र राहील. त्यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत थंडी जाणवेल, पण दुपारचे तापमान सध्या 30 ते 35 अंशांदरम्यान राहील. मध्य भारतापर्यंतच्या भागांत सकाळी आणि संध्याकाळी धुके राहील. संपूर्ण खुल्या स्थानीही हलके धुके राहू शकते. दुसरीकडे, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि संपूर्ण ईशान्येकडील राज्यांत हवामान शुष्क असेल. पुढील आठवड्यात हळूहळू तापमानात घसरण होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post