जेऊर येथील हॉटेल फोडून खाद्यपदार्थांची चोरी

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथील नगर-औरंगाबाद महामार्गालगत असणा-या हॉटेलचे कुलूप तोडून खाद्यपदार्थांची चोरी करण्यात आल्याची घटना मंगळवार दि. २१ रोजी रात्री घडली आहे.

       नगर औरंगाबाद महामार्गावर जेऊर येथे चंद्रकांत शिंदे यांचे गुरुकृपा नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे कुलूप तोडून हॉटेलमधील खाद्यपदार्थांची चोरी केली आहे.हॉटेलमधील कुरकुरे, बिस्कीट पुडे, क्रीमरोल व इतर खाद्यपदार्थ चोरून नेले आहेत.

      हॉटेलमधील जास्त नुकसान झाले नसले तरी चोरीच्या घटनेने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती हॉटेलचे संचालक चंद्रकांत शिंदे यांनी दिली.

       नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात डिझेल चोर तसेच रस्ता लूट, मोटरसायकल चोर व भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांच्या टोळ्या रात्री महामार्गावर फिरत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post