अरुणोदय नेत्रालयाचे कार्य कौतुकास्पद - पद्मश्री पोपटराव पवार

माय अहमदनगर वेब टीम नगर तालुका-- अरुणराव फाळके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत नेत्र शिबीर व नेत्र शस्त्रक्रियांचे आयोजन करून समाजसेवेमध्ये अरुणोदय नेत्रालयाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे.

       पद्मश्री पोपटराव पवार यांनी अरूणोदय नेत्रालयास सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार डॉक्टर दिलीप फाळके यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी बोलताना पद्मश्री पवार यांनी अरुणोदय नेत्रालयाचे कार्य कौतुकास्पद आहे. दहा वर्षात दोन लाखांहून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी व उपचार तसेच दहा हजारांहून अधिक यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कर्जत मध्ये देखील डॉ. श्रीकांत फाळके यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णांची सेवा करण्यात येत आहे.

     अरुणोदय नेत्रालयामध्ये आधुनिक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अरुणोदय नेत्रालय हे समाजसेवेत नेहमीच पुढाकार घेत असते. मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत नेत्र शस्त्रक्रियांचे आयोजन करून अनेक गोरगरीब रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवा करणारे म्हणून अरुणोदय नेत्रसेवा रुग्णालयाने जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. असेही पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.

        याप्रसंगी डॉ. दिलीप फाळके, डॉ.दिपाली फाळके, विभागप्रमुख संजयसिंह फाळके उपस्थित होते. यावेळी डॉ. दिलीप फाळके यांनी अरुणोदय नेत्रालय हे गोरगरीब तसेच ग्रामीण भागातील जनतेला लाभ मिळावा या हेतूने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करत असुन ती सेवा यापुढेही सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post