श्रुती डोकडे हिचे दहावीच्या परीक्षेत यश

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका-- चाणक्य चॅरिटी ट्रस्ट पुणे द्वारा संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय जेऊर(बा) ता.नगरचा एस. एस.सी परीक्षा मार्च 2022 चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

    प्रथम क्रमांक कु. श्रूती मारूती डोकडे (93:80), व्दितीय क्रमांक कु. वैष्णवी पांडूरंग गायकवाड (93:40) तर तृतीय क्रमांक कु. दिपाली नवनाथ म्हस्के (92:40) तसेच कु. रूतूजा आप्पासाहेब आवारे(92:40) ,चतूर्थ क्रमांक कु. गौरी मच्छिंद्र काळे (92:20) हिने मिळविला आहे. उर्वरीत सर्व विद्यार्थी हे 75% च्यापूढे मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्षा श्रीमती उषाताई नवनाथराव आव्हाड,संस्थेचे उपाध्यक्ष गिरीषजी आव्हाड, भास्कररावजी आव्हाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय डोकडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post