उपक्रमशील शाळा म्हणून न्यू इंग्लिश स्कूल वाळकीचा नावलौकिक – श्रीम. मीनाताई जगधने




माय अहमदनगर वेब टीम -

नगर तालुक्यातील ग्रामीण भागात असूनही शहरी शाळांपेक्षाही अनेक उपक्रम रयत च्या वाळकी येथील विद्यालयात राबविले जात आहेत. आगामी काळात या शाळेत स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरु होईल अशी अपेक्षा रयत शिक्षण संस्थेच्या म्यानेजिंग कौन्शील सदस्या श्रीम.मीनाताई जगधने यांनी व्यक्त केली.

      नगर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या वाळकी येथील माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन चार माजली इमारत भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडूपाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे  अध्यक्ष  मा. नामदार आशुतोषजी काळे , रयत शिक्षण संस्थेचे  म्यानेजिंग कौन्शील सदस्य सर्वश्री दादाभाऊ कळमकर, राजेंद्र फाळके,बाबासाहेब भोस,बाळासाहेब बोठे ,रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर,संस्थेचे माजी सचिव प्रि.शिवाजीराव भोर आदी प्रमुख उपस्थित होते.

      यावेळी बोलताना श्रीम.मीनाताई जगधने म्हणाल्या कि, वाळकी शाळा ग्रामीण भागात असूनही या ठिकाणी बाळासाहेब बोठे यांच्या उपक्रमशील प्रयत्नातून गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.त्यातून विद्यालयाची गुणवत्ता तर वाढलीच .परंतु कौश्यल्य आधारित शिक्षण,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,भरतीपूर्व मार्गदर्शन,इंग्लिश स्पिकिंग कोर्स असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यापुढील काळात या विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रहि सुरु होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शाळा,शिक्षक याबरोबरच पालकांचीही मोठी जबाबदारी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी वाढली आहे. दुध-भात याची फोड करत त्यांनी मुलांच्याकडे दुर्लक्ष करू नका.त्यांच्याबरोबर बोला वेळ द्या.त्यांना धमकी देऊ नका.दडपण अनु नका.तू असा ,तू हुशार नाही असा तू चा मारा करू नका,तर त्याला नकार असो,अपयश असो पचवण्यास शिकवा. या चार गोष्टींकडे लक्ष द्या.चारित्र्य,चांगले विचार,आचरण महत्वाचे असल्याचे मीनाताई यांनी सांगितले.

 संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडूपाटील यांनी संस्था पदाधिकारी पदरमोड करून न्हवे तर झळ सोसून संस्थेच्या शाखा उभारणी केली आहे. पूर्वी पडवी ,मंदिरात शाळा भरत होत्या. त्या नंतर पत्र्याच्या ,स्लाब व आता बहुमजली इमारती या कार्यकर्ते, ग्रामस्थ ,सेवक यांच्या योगदानातून उभ्या राहिल्याचे त्यांनी सांगितले.

  रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे  अध्यक्ष  मा. नामदार आशुतोषजी काळे यांनी भौतिक सुविधा या उत्तम असल्याच पाहिजे.असे सांगितले. परंतु विद्यार्थ्यांची गुणवत्ता हा शाळेचा मापदंड असतो.किती विद्यार्थी गुणवत्तेत आले हे महत्वाचे आहे. भौतिक सुधारणा काळानुसार होत आल्या आहेत. या पुढील काळातही त्या होण्यासाठी ग्रामस्थ,माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.यावेळी वाळकी विद्यालयास नामदार काळे यांनी १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

दादाभाऊ कळमकर यांनी चीन मध्ये कौश्यल्य आधारित शिक्षण दिल्याने अनेक उत्पादने तेथे घरोघरी तयार होत असल्याचे सांगितले.वाळकी शाळेतही हा उपक्रम राबवीत असल्याने तो अनुकरणीय आहे.तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान हा चांगला पायंडा असल्याचे कळमकर यांनी सांगितले.

 राजेंद्र फाळके यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी माणसात देव पाहण्याचे शिकवले.अनेकांना शिक्षणाची दारे खुली केली. यावेळी फाळके यांनी वाळकी विद्यालयास ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

 प्रास्ताविकात बाळासाहेब बोठे यांनी  वाळकी विद्यालयाच्या भौतिक सुविधा विद्यार्थ्याच्या वाढत्या संख्येमुळे अपुऱ्या पडत असल्याचे सांगितले.तर  जुन्या इमारती वापरण्यास योग्य नसल्याने नवीन ३ कोटी  रुपयांची नवीन चार माजली इमारत उभी राहत असल्याचे सांगितले.शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी इतर शाळातील तज्ज्ञ मार्गदर्शक बोलावून शिक्षकांची कार्य शाळा आयोजित केली. तर बाहेरील गुणवत्ता धारक शाळांना भेटी देण्यात आल्याचे श्री बोठे यांनी सांगितले .

यावेळी देणगीदारांचा व गुणवत्ताधारक विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.सर्वश्री   बाबासाहेब भोस,माजी सचिव शिवाजीराव भोर,विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर,मुख्याध्यापक एस.जी.शिंदे ,यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन रमेश काळे,काकासाहेब देशमुख यांनी केले.तर आभार पर्यवेक्षिका शर्मिला पाटील यांनी मानले.

कार्यक्रमास सर्वश्री बाळासाहेब हराळ ,विक्रम बोठे,प्रताप बोठे,स्वातीताई बोठे,दिलीपराव भालसिंग,महादेव कासार,रंगनाथ निमसे,शरद बोठे,एन,डी,कासार , विक्रम कासार,  संदीप कासार, मनोज  भालसिंग,दादासाहेब कासार आदि उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post