वेटलिफ्टिंग स्पर्धेत मंडळाधिकारी प्रताप कळसे यांना सिल्व्हर मेडल

माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स या स्पर्धेत महसुल विभागातील मंडळ अधिकारी प्रताप कळसे यांनी वेटलिफ्टिंग या क्रिडाप्रकारात १२० किलोग्रॅम वजन उचलुन सिल्व्हर मेडल मिळवीले आहे. तसेच पॉवरलिफ्टिंग या क्रिडाप्रकारात २८० किलोग्रॅम वजन उचलुन ब्रॉन्झ मेडल मिळविले आहे. या स्पर्धा केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे पार पडल्या असुन सदरच्या स्पर्धेत देशभरातुन खेळाडु सहभागी झाले होते.

 त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल नगर - पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी त्यांचे अभिनंदन केले असुन पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल नगर तालुका महसूल विभागाच्या वतीने तसेच पांढरीपुल येथील सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, डोंगरगण माजी सरपंच कैलास पटारे, प्रा. शरद मगर, राजु पवार, पत्रकार शशिकांत पवार, राम पटारे यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post