माथणी सेवा संस्था निवडणूक बिनविरोध माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सत्कार

 

माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका -माथणी ता. नगर सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध नूतन संचालकांचा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते सत्कारकरण्यात आला.
माथणी येथील सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक गावातील दोन्ही गटांच्या सामंजस्याने बिनविरोध झाली
  ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी  सरपंच मंजाबापू घोरपडे, ज्येष्ठ नेते कचरू भाऊ घोरपडे भाजप तालुका समन्वयक महेश  वाघ,अण्णा जगताप, विलास घोरपडे अशोक कांडेकर यांनी प्रयत्न केले माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल लांडगे तसेच बाजार समिती संचालक कानिफनाथ कासार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली
  नूतन संचालक दिनकर थोरात इकबाल सय्यद विनायक घोरपडे रामकिसन वाघ जयश्री घोरपडे सुदाम ठोंबे दत्तात्रय वाघ सोमनाथ गायकवाड चंद्रकला घोरपडे नर्मदा कांडेकर तोलाजी घोरपडे बाबासाहेब घोरपडे यांचा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सत्कार केला व शेतकरी हितासाठी सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवून सोसायटी ची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल अभिनंदन केले व संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post