मंत्री बाळासाहेब थोरातांचे राज ठाकरेंच्या सभेबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाले...

 


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - औरंगाबाद येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या सभे संदर्भात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. संगमनेर येथे एका कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारां समवेत बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. 


बाळासाहेब थोरात म्हणाले, आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही एक चळवळ उभी राहिली होती. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना या चळवळीला यश आले. महाराष्ट्राची आतापर्यंतची वाटचाल प्रगतीच्या दिशेने झाली आहे. जे स्वप्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धुरिणांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अजूनही खूप काम करावे लागेल ही वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुखी-संपन्न झाले पाहिजे. नवी पिढी आणखी पुढे गेली पाहिजे. त्याकरिता आम्हा सर्वांना प्रयत्न करायचा आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यघटनेने आपल्याला काही अधिकार दिले आहेत. काही मत मतांतरे करायला परवानगी दिली आहे. मात्र ते राज्यघटनेच्या चौकटीत राहून करायचे आहेत. दुर्दैवाने काही जण सवंग राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. माणसा-माणसात, धर्मांत भेद निर्माण करणे, त्याच्यावर राजकारण करत आहेत. राजकारण हे विकासाचे असले पाहिजे आणि धर्महा व्यक्तिगत असला पाहिजे. मात्र दुर्दैवाने राजकारण सोपे कसे करायचे मते सहजतेने कसे मिळतील. या पद्धतीने जनतेची फसवणूक केली जात आहे. जनतेत फुट पाडून मते मिळविणे ही जनतेची फसवणूक आहे. देश व राज्यातील जनतेना यात फसू नये.

राज ठाकरे यांच्या सभेतील गर्दी मतांत परिवर्तीत होणार नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. मताचे विभाजन, समाजाचे विभाजन करण्याचा चाललेला प्रयत्न यापेक्षा त्यांना विकासाची गरज आहे. भाषण ऐकण्यासाठी कदाचित लोक जमतील मात्र मतात त्याचे परिवर्तन होणार नाही.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही निर्माण होऊ देणार नाही. याची काळजी पूर्णपणे प्रशासन घेईल. ही जबाबदारी प्रत्येक सुज्ञ नागरिक व नेता म्हणून मिरवतो त्याचीही आहे. कुठल्याही परिस्थितीत हे राज्य शांततेत व कायद्यानुसार चालले पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post