प्रियंका लामखडे 'महाराष्ट्र आयडॉल' पुरस्काराने सन्मानित

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांना 'महाराष्ट्र आयडॉल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

      निंबळक गावात सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर सौ. प्रियंका लामखडे यांनी गाव विकासाच्या बाबतीत घेतलेले धाडसी निर्णय व गावासाठी करत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सकाळ उद्योग समूहाच्या वतीने महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराने शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.

       निंबळक गावच्या ग्रामपंचायतच्या आदर्श कार्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अजय लामखडे यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत मार्फत विविध विकास कामे सुरू आहेत. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच गाव विकासाचे निर्णय घेता येत असल्याची माहिती सौ. प्रियंका लामखडे यांनी दिली.

     सौ. प्रियंका लामखडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आमदार निलेश लंके, नामदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्रामभैय्या जगताप, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

____________________________________

 पुरस्काराचे मानकरी निंबळक ग्रामस्थ

मला मिळालेल्या सर्व पुरस्काराचे खरे मानकरी हे निंबळक गावचे ग्रामस्थ आहेत. गावातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच गाव विकासाचे निर्णय घेण्यात येत आहेत. गावात विकासकामात राजकारण विरहित सर्वांचे सहकार्य लाभते ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मला मिळालेले पुरस्काराचे खरे मानकरी निंबळक ग्रामस्थच आहेत.

 ........सौ.प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

____________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post