'सर्वधर्मसमभाव' हि निंबळक गावची ओळख- अजय लामखडे

 माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-- नगर तालुक्यातील निंबळक गावात अठरापगड जातीचे लोक मोठ्या गुण्या-गोविंदाने राहत असून सर्वधर्मसमभाव ही निंबळक गावची ओळख तसेच संस्कृती असल्याचे प्रतिपादन युवा नेते अजय लामखडे यांनी केले.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी युवा नेते अजय लामखडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, नांगरे, सोनवणे गुरुजी, जयराम खेडकर व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

     यावेळी बोलताना अजय लामखडे यांनी सांगितले की, निंबळक गावात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या आनंदाने राहत आहेत. येथील जातीय सलोखा हा तालुक्यासाठी आदर्श ठरत आहे. प्रत्येक सण उत्सव सर्व एकत्रित येऊन मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. प्रत्येक ग्रामस्थ जातीभेद विसरून एकमेकांच्या सुख दुखात नेहमी सहभागी होतात.

     निंबळक गावातील ही परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम तरुण पिढीने करणे गरजेचे आहे. आदर्श अशा निंबळक गावच्या संस्कृतीला तडा जाता कामा नये. यावेळी निंबळक ग्रामस्थ व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

__________________________________

 निंबळक गावची आदर्श संस्कृती


 निंबळक गावात अठरापगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. येथे कधीही जातीभेद केला जात नाही. सर्व लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. सर्वधर्मसमभाव ही निंबळक गावची आदर्श अशी संस्कृती आहे. गावातील प्रत्येक नागरिकांनी या संस्कृतीचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

..... अजय विलास लामखडे (युवा नेते)

________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post