माय अहमदनगर वेब टीम
मुंबई येथे विविध मान्यवरांच्या हस्ते होणार गौरव
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी दत्तात्रय डोकडे यांचा समाजसेवे बद्दल तसेच कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
दत्तात्रय डोकडे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे नगर तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात केलेले कार्य व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या दत्तात्रय डोकडे यांचा मुंबई येथे सन्मान करण्यात येणार आहे.
शनिवार दिनांक ३० एप्रिल रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेल महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने डोकडे यांचा गौरव करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माननीय शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार, जितेंद्र आव्हाड, नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. दत्तात्रय डोकडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment