निंबळक शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न
अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला .
गेली दोन वर्षे कोरोना मुळे मुले प्रत्यक्ष शाळेत जाऊ शकली नाहीत. त्यामुळे अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या पूर्व प्राथमिक शिक्षणापासून बहुतांश मुले वंचित राहिली. येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या दाखल पात्र मुलांची पूर्व तयारी व्हावी म्हणून शासन स्तरावरून बालक व पालकांसाठी शाळापूर्व तयारीचे दोन मेळावे घेण्याचे उद्दिष्ट राज्यातील सरकारी शाळांना देण्यात आले आहे.
त्याचाच भाग म्हणून निंबळक शाळेत पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इयता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भाषिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, गणन पूर्व तयारी व शिकण्याची तयारी झाल्याबद्दल प्रमाणपत्र अशा सात टप्प्यांवर या मेळाव्यात मुलांशी संवाद साधण्यात आला. प्रत्येक पालकाला एक पुस्तिका देण्यात आली.या द्वारे पुढील ८ ते १० आठवडे पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवकांच्या माध्यमातून मुलांच्या शिकण्याची तयारी करवून घेतली जाणार आहे.
उदघाटन प्रसंगी विस्तार अधिकारी रामनाथ कराड, युवा उद्योजक अजयशेठ लामखडे, पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार, ग्रा.पं. सदस्य नाना दिवटे, एस. एम. सी. सदस्य सौ वर्षा कोतकर, गावातील ग्रामस्थ शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक व दाखलपात्र विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
____________________
विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा
कोरोनाच्या काळात दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता कोरोना आटोक्यात आला असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांनीही मेहनत घेण्याची गरज आहे. शाळेतील नवीन विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा. कोरोना मुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
....अजय लामखडे (युवा उद्योजक)
__________________

Post a Comment