घोसपुरी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक झरेकर ; व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र घोडके



माय अहमदनगर वेब टीम -

नगर तालुक्यातील घोसपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमनपदी प्रा.अशोक किसन झरेकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र मुरलीधर घोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नगर पंचायत समितीचे माजी सभापती व सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक अशोक झरेकर यांच्या उपस्थितीत या निवडीची प्रक्रिया पार पडली.

नगर तालुक्यातील घोसपुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर  तसेच प्रा.अशोक किसन झरेकर यांच्या  गटाच्या नेतृत्वाखालील पद्मावती शेतकरी विकास पॅनलने १० जागा जिंकत सोसायटीची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले होते. या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी विशेष सभा संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वंदना ठोकळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना सोसायटीचे सचिव सुनिल झरेकर यांनी सहाय्य केले.

चेअरमन पदासाठी प्रा.अशोक झरेकर यांच्या नावाची सूचना माजी सभापती अशोक झरेकर यांनी मांडली, त्यास अशोक भानुदास हंडोरे यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमनपदासाठी राजेंद्र घोडके यांच्या नावाची सूचना सुनिल मच्छिंद्र ठोकळ यांनी मांडली. त्यास बाळासाहेब बाबाजी झरेकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना ठोकळ यांनी जाहीर केले.

या विशेष सभेसाठी संचालक यमन रामचंद्र कवडे, बाळासाहेब यशवंत झरेकर, दिनकर दगडु पारधे, सरस्वती दिनकर खोबरे, कैलास इधाते, राजु पाचारणे, स्वाती झरेकर आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post