नगर तालुका- नगर शहरातील माळीवाडा येथे महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माळीवाडा येथील विशाल गणपतीची तालीम मित्र मंडळाच्या वतीने महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गणपती तालीम मित्र मंडळाच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केले. दरवर्षी महात्मा फुले यांची जयंती गणपतीची तालीम मित्र मंडळाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवुन साजरी करण्यात येत असते. त्यामुळे गणपतीची तालीम मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे.
Post a Comment