लसीकरणाचा वेग वाढला; लवकरच घडवणार नवा इतिहास


मुंबई | करोना corona महामारीविरोधात लढताना प्रतिबंधक लसीकरण vaccination मोठे आणि परिणामकारक शस्त्र ठरले आहे. भारतात लसीकरणातून करोनाविरुद्ध युद्ध सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढला असून त्यात भारत लवकरच महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. येत्या पाच-सहा दिवसांत देशात करोना लसवंतांची संख्या 100 कोटींचा आकडा पार करणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने Union Ministry of Health जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे शनिवारी सायंकाळपर्यंत देशात 97.62 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शनिवारी 38 लाख लसमात्रा दिल्या गेल्या. त्यानंतर आता भारत लसीकरणाचा 100 कोटींचा नवा इतिहास घडवणार आहे.

लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून 39,25,87,450 नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. 11,01,73,456 लोकांना दुसरी लसमात्रा दिली गेली आहे. आतापर्यंत देशातील 69,45,87,576 लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. 28,17,04,770 जणांना दुसरी लसमात्रा दिली गेली आहे.

भारतात सध्या 18 वर्षांहून जास्त वयाच्या नागरिकांना करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. लसीकरणात 100 कोटींचा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया Union Health Minister Mansukh Mandvia यांनी करोनावरील एक गाणेही जारी केले आहे.

लसीकरणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अभियान राबवत आहोत. पुढील आठवड्यात देश 100 कोटी लसीकरणाच्या टप्पा गाठेल. लस विकसित करण्यासाठी साधारणपणे 5-10 वर्षे लागतात, पण देशाने लस तयार करण्यासाठी तत्काळ कच्चा माल उपलब्ध करून देण्यापासून तयार लस केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची तत्काळ व्यवस्था केली, असे मांडवीय म्हणाले.

लसीकरणावर गाणे

100 कोटी लसीकरणाच्या उद्दिष्टाकडे आगेकूच करण्याच्या प्रयत्नांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका गाणे तयार केले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि हरदीपसिंग पुरी यांनी भारताच्या लसीकरण मोहिमेवर आधारित गाण्याची चित्रफित प्रकाशित केली. गायक कैलाश खेर यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post