Rajya Sabha : राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर दिल्ली | काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या (Congress leader Rajiv Satav) निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून (Congress) कुणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले होते. अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. (Rajya Sabha by-elections from Maharashtra)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या अत्यंत विश्वासू अशी ओळख असणाऱ्या माजी खासदार रजनी पाटील (Former MP Rajni Patil) यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे.

रजनी पाटील (RajaniPatil) यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या किचन कॅबिनेट मधील एक नेत्या अशीही त्यांची ओळख आहे. युवा नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक (Mukul Wasnik), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसने एका महिला नेत्याला संधी दिली आहे.

रजनी पाटील या वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या मानसकन्या असून मूळच्या त्या सांगली जिल्ह्यातल्या. पुढे विवाहानंतर त्या मराठवाड्यात (Marathwada) स्थाईक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील (Former Minister of State for Sports Ashok Patil) यांच्या त्या पत्नी आहेत. याआधी बीडमधून त्यांनी लोकसभा (Beed Lok Sabha) निवडणूक लढवली होती.

राज्यसभेसाठी पोटनिवडणूक महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post