मुंबई | ‘खतरों के खिलाडी 11’ ची स्पर्धक अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ती तिच्या करिअरविषयी जेवढी चर्चेत असते तेवढीच तिच्या पर्सनल लाईफविषयीही तेवढीच चर्चेत असलेली पहायाला मिळत असते. अशातच श्वेता तिवारीची प्रकृती ठीक नसल्याचं समोर येत आहे.
श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी 11’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. परंतु, आता ती शूटिंग संपवून पुन्हा भारतात परतलीय. मात्र आात तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
अभिनेत्री श्वेता तिवारीला अशक्तपणा आणि ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तिची प्रकृती ठीक असल्याचं तिच्या टीमनं सांगितंल आहे. श्वेताला रुग्णालयात दाखल केल्याचं समजताच तिच्या चाहत्यांना चिंता लागली होती. अनेकांनी तिच्या तब्बेतीविषयी विचारपूस केली.
दरम्यान, ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार श्वेताच्या टीमने सांगितले की, काही काळापासून श्वेता सतत प्रवास करत असून तिला पुरेशी विश्रांती मिळत नव्हती, यातच हवामान बदल या कारणामुळे तिलाा त्रास झाला.
Post a Comment