सातारा | भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना नाट्यमय वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता सोमय्या कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
मला कोल्हापूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. लोकशाहीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे की, घोटाळे उघडे करणाऱ्यांनाच अटक केली जात आहे. तक्रारदाराला रोखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारनं केलं आहे, असं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
पुढे सोमय्या यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री तुम्ही भगवा सोडून हिरवा धारण करा. पण मला गणपती विसर्जनापासून रोखू शकत नाहीत. गैरकायदेशीर डांबून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा सहन करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. यामध्ये त्यांनी ठाकरे सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले पाहायला मिळत आहे.
Post a Comment