सह्याद्रीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; शरद पवारांनी दिले ‘हे’ आदेश



मुंबई | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील दिग्गज नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. सुमारे दोन तास बैठक ही चालली. महाराष्ट्रात पुढच्या वर्षी महापालिका निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असणार आहे, यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे, मुंबई, पुणे, औरंगाबाद यांसह इतर 17 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषद त्याचबरोबर 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक पुढल्या वर्षी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं, यावर चर्चा झाली. चर्चेनंतर शरद पवारांनी पक्षातील रणनितीकारांना महत्त्वाचे आदेश दिले.

ज्या ठिकाणी आघाडीसोबत निवडणूक लढण्याची गरज आहे. फक्त त्याच ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल, असे आदेश शरद पवारांनी पक्षातील रणनितीकारांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे. ओबीसी आरक्षणाचा निकाल जोपर्यंत लागतं नाही आणि ओबीसी समाजाचं आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात एकही निवडणूक होऊ नयेत, अशी भूमिका देखील या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात कोरोना नियमांचं आणि गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील भाजप नेते दुटप्पीपणा केला जात असल्याचं देखील या बैठकीत मांडण्यात आलं. तर केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असला तरी त्याला कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ असंही या बैठकीत मांडण्यात आलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post