सोमय्यांना रेल्वेतून उतरवलं, राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

 


कोल्हापूर | कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हा अधिक्षक तिरुपती काकडे यांनी विनंती करुन देखील भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कोल्हापूरला चालले होते. परंतु सोमय्या कोल्हापूरात पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये रेल्वेमधून खाली उतरवलं आहे.

तिरुपती काकडे यांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये रेल्वेतून खाली उतरले. रेल्वेतून खाली उतरल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, प्रशासन आणि पोलिस माझे शत्रू नाहीत. त्यांनी विनंती केल्यानं मी रेल्वेतून खाली उतरलो आहे.

किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते सोमय्यांविरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरात सोमय्यांविरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोल्हापूरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापत चाललं आहे. काल रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात पायताण निदर्शन केलं होतं.






0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post