पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…



 सातारा | भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. सोमय्यांना सध्या कराडच्या सर्किट हाउसवर ठेवण्यात आलं आहे. तिथेच सकाळी नऊच्या दरम्यान सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याशिवाय सोमय्या यांनी म्हटलं की, ठाकरे सरकार इतकं घाबरलं आहे की मला कोल्हापूरला जाण्यास बंदी घातली.

सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखत ताब्यात घेतलं. त्यामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवारानं सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post