दिवाळीनंतर राज्यात भाजपचे सरकार खा.डॉ. विखे यांचा कर्जतमध्ये दावा

 


कर्जत | राज्यात दिवाळीनंतर भाजपचे सरकार येईल, असा दावा नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जतमध्ये केला.

पंचायत समिती मध्ये आढावा खा. डॉ. विखे बोलत होते. यावेळी उपस्थितीत नागरिकांनी प्रश्न आणि समस्या सुटत नसल्याची तक्रारी खा. डॉ. विखे पाटील यांच्याकडे केली. त्या तक्रारीला उत्तर देताना खा. डॉ. विखे म्हणाले, दिवाळीनंतर आपल्या विचारांचे सरकार सत्तेवर येणार असून त्यावेळी तुमचा कोणतेच प्रश्न शिल्लक राहणार नाही. त्यामुळे थोड्या दिवस फक्त थांबा, यावरुन महाराष्ट्रात सत्तांतर होणार असल्याचा सूूचक इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी दिला. केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 72 हजार कोटी रुपये वाटले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणार्‍यांना 50 हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली. परंतु ती केवळ कागदावरच राहिली असून राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा बोजवारा उडाला, असल्याची टीका त्यांनी विखे यांनी केली.

तत्पूर्वी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी करोना लसीकरण मोहीम याचा आढावा घेतला आणि त्यानंतर पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोल, गटविकास अधिकारी नानासाहेब आगळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश कुराडे, वन विभागाचे अधिकारी केदार मुख्याधिकारी गोविंद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, अनिल दळवी, काकासाहेब ढेरे, आशा वाघ, मंदा होले, राजश्री थोरात, सुनील यादव, डॉ. राऊत युवराज, बापूराव गायकवाड, सुनील काळे, नवनाथ तनपुरे आदी उपस्थित होते.

काही भागात लसीकरण कमी

खा. विखे म्हणाले, जिल्ह्यामध्ये अतिशय व्यवस्थित आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यामुळे लसीकरण सुरू आहे. मात्र, काही गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे, ही बाब चिंताजनक आहे. ज्या ठिकाणी लसीकरण प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी विशेष मोहीम आरोग्य विभागाच्या मार्फत राबविली जाणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत सर्व गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सारखे झालेले असेल यासाठी प्रयत्न केले जातील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post