मांसाहार प्रेमींसाठी मोठा धक्का, ‘या’ गोष्टीचे दर वाढण्याची शक्यता


 


मुंबई | मागील मार्च-एप्रिल महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. लोकांमध्ये एक प्रकारची कोरोना विषयी भीती निर्माण झाली आहे. त्यावर प्राथमिक उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात मटण, मासे, चिकन आणि अंड्यांचा वापर आहारात केला जात आहे. अशातच आता चिकन आणि अंड्यांच्या भावात वाढ होण्याची शक्यता असल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा अंडी आणि चिकनचे भाव वाढले असून बाजारपेठेत या पुढील काळात देखील दोन्ही वस्तुंचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे. महिन्याच्या शेवटी चिकन आणि अंड्ड्यांच्या भावात 25 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या अंड्याला मागणी वाढली आहे परंतु पुरवठा कमी होत आहे त्यातच अंड्याचे भाव वाढले आहेत. या पुढेही भाव वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. चिकनची किंमतही 100 रुपये प्रती किलो आहे. कोंबड्यांना पोसण्यासाठी लागणाऱ्या धान्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. धान्याच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या किमतीत तीन पटींनी जास्त वाढ झाली असून ती 3500 ते 10000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. आता या किंमतीवरच शेतकऱ्याचे उत्पन्न अवलंबून असेल.

दरम्यान, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डॉक्‍टर मंडळीकडूनच अंडीचा आहार करण्यास सांगितले जात आहे. या सोबत इतर कारणाने देखील पुन्हा एकदा बाजारात मांसाहाराला मागणी वाढली आहे. त्यामुळे चिकन व अंडी यांना पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post