भाजप नेत्यांची कुंडली तपासा आ . रोहित पवार : विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीच उत्तर द्यावं

माय वेब टीम 

अहमदनगर - भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांचे वक्तव्य राज्यातील समस्त महिलांचा अपमान (Insult to women) करणारे आहे. हीच भाजपची (BJP) विचारसरणी, संस्कृती आहे का? असा सवाल करतानाच आता त्यावर विरोधी पक्षनेते आ. देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनीच काय ते बोलावे. पंतप्रधान मोदीपासून (PM Narendra Modi) ते भाजपच्या अनेक नेत्यांसोबत अनेक उद्योगाचे फोटो आहेत. त्याचीही चौकशी करून कुंडली बाहेर काढली पाहिजे, असे प्रत्युत्तर राष्टलवादीचे आ. रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी दिले.

आ. पडळकर (MLA Padalkar) यांनी ‘रात गेली हिशेबात अन् पोरगं नाही नशीबात’ अशी टीका (criticism) पवार यांच्यावर केली होती. त्याला गुरूवारी आ.पवार यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. आ. पवार म्हणाले, पडळकरांची ही भाषा सामान्य आणि श्रीमंत अशा सर्वच वर्गातील महिलांना न रुचणारी आहे. यातून त्याची विचारसरणी कळते. भाजप नेते आ. फडणवीस (BJP Devendra Fadnavis) त्यावर काहीच बोलत नाहीत, त्याअर्थी हीच भाजपचीही हीच विचारसरणी असल्याचे सांगत ही संस्कृती चांगली नसल्याने आ. पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीच पडळकर यांनी केलेले वक्तव्य तपासून त्यावर चांगली, वाईट प्रतिक्रिया द्यायला हवी, अशी अपेक्षा पवार (MLA Rohi Pawar) यांनी व्यक्क्त केली.

पडळकर यांच्या गाडीवर हल्ला (Padalkar Car attack) करणार्‍या कार्यकर्ताचा आ. पवार सोबत असलेला फोटो (Photo) पडळकर यांनी ट्विट (Tweet) केला आहे. त्यासंदर्भात पवार म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेकांचे फोटो आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यासोबतचे अनेकांनी काढलेले फोटो चर्चेत आले होते. भाजपकडे सीबीआयसारख्या तपास यंत्रणा (BJP CBI) आहेत. त्यांनीच भाजप नेत्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या फोटोची चौकशी (Inquiry into Workers photos) करून कुंडली बाहेर काढावी, असे आवाहन आ. रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केले.

आरक्षण प्रश्नावर भाजपचे राजकारण

ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपचे आंदोलन हे फक्त राजकीय हेतूने प्रेरित आहे. ओबीसी आरक्षणाच्या व इतर समाजाच्या हिताचे ााजपला काही घेणे-देणे नाही. त्याचे राजकारण करून ते राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा त्यांना मिळविता आला नाही. आता सत्ता द्या आरक्षण देतो, असे म्हणतात. सत्ता मिळाली तरच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देणार का? असा सवाल आ. पवार यांनी फडणवीस यांना केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post